हर्षदा सोनोने, अकोलाकोरोनाबाधित रुग्णांना रूग्णालयाकडून जेवण दिले जात असले, तरी रुग्णांना सकस आणि पोषक आहार मिळतो की नाही हे महत्वाचे आहे. विषाणूशी लढा देणाऱ्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सक्षम होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अशा रुग्णांना पोषक आहार न मिळाल्यास त्यांचा कोविडशी लढण्याची शक्ती तोकडी पडण्याची शक्यता असते. नेमकी हीच बाब अकोला कोविड सेंटरमध्ये पाहायला मिळत नाही किवा याच गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. या सेंटरमधील आहाराचा दर्जा घसरला असून रूग्णांची गैरसोय होत असल्याचा प्रकार अकोला सर्वोपचार रूग्णालयात पाहायला मिळत आहे. ( are given at )

आज कोविड सेंटरमधील रुग्णांना सकाळच्या जेवणात दाताने तुटतील नाही अशा चपात्या मिळाल्या. याबाबत रुग्णांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. निकृष्ट भोजनाबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोविड सेंटरमधील प्रत्येक रुग्णांना सकस व पौष्टिक आहार देण्याचे निर्देश आहेत. आज रूग्णांच्या सकाळच्या आहारात चक्क कडक चपात्या ज्या दातानेही न तुटणाऱ्या जेवणात देण्यात आल्या. कडक चपात्या दात नसलेल्या रूग्णाला तोडायला कठीण जात होत्या. तर चपात्यांबरोबरच आहारातील इतर पदार्थांचा दर्जा देखील खालावला असल्याचे दिसून आले.

या बरोबर चहा निव्वळ गरम पाण्यासारखा असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. त्यात रुग्णांनी प्रसासनावर आरोप केला असून कोविड सेंटरमधील रूग्णांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता सुधारण्याची मागणी त्यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

लोकप्रतिनिधींची मात्र ठेवली जाते बडदास्त
जेव्हा लोकप्रतिनिधी कोविड सेंटरला भेट देतात तेव्हा मात्र सकस आहाराचे ताट लोकप्रतिनिधींपुढे रुग्णांना दिले जाते. रुग्ण एखाद्या हॉटेलमध्ये जेवतोय की काय अशा प्रकारे त्यांना जेवण वाढले जाते. सोमवारी भारतीय जनता पार्टीचे आमदार रणधीर सावरकर गोवर्धन शर्मा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली असता त्यांना मात्र पंचपक्वान्न वाटावे असे ताट वाढण्यात आले होते. याबाबत रुग्णांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लोकप्रतिनिधीनि भेट दिली असता वेगळे ताट व त्यांच्या पाठीमागे कोरोना बधितांना दाताने तुटणार नाहीत अशा चपात्या देणे याला कुठली व्यवस्था म्हणायची, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांमधून व्यक्त केल्या जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-
यापूर्वी मागील वर्षी निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्यामुळे पालकमंत्री बच्चू कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाची खरड पट्टी काढली होती. त्यानंतर कोविड सेंटरमधील रूग्णांना चांगल्या दर्जाचा आहार मिळू लागला होता. मात्र कालांतराने रूग्णांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता घसरत गेली.

क्लिक करा आणि वाचा-
कोविड वार्डातील नागरिकांची गैरसोय होण्याचे प्रकार अकोल्यात काही नवीन नाहीत. मात्र को कोरोनाशी लढा देण्यासाठी महत्वाचा ठरणारा दोन वेळेचा सकस आहार मिळावा हीच अपेक्षा रुग्ण व्यक्त करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here