बुलडाणा: ‘बुलडाणा नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकास कामे करिता नगराध्यक्षा नजमुन्नीसा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांच्याकडून कमिशनची मागणी केली जाते. कमिशन न दिल्याने विकास कामांची कामांची निविदा रद्द केल्या जाते’, असा आरोप करीत काँग्रेसचे नगरसेवक आकाश दळवी यांनी काल आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काल सायंकाळच्या सुमारास कारंजा चौकातील नगर परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळेतील बांधकाम विभागाचे कामकाज चालणाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेत रद्द करण्यात आलेल्या कामे त्वरित सुरू करण्यासाठी केला. या आत्मदहन प्रकरणामुळे शाळा परिसरात बघ्यांची मात्र मोठी गर्दी जमली होती. (Attempt of self-immolation of in )

अण्णाभाऊ नागरी वस्ती सुधारणा योजना तथा नगर परिषद निधी अंतर्गत प्रभाग ११ मध्ये सिमेंट कोंक्रिट रस्त्यासह दोन्ही बाजूचे पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाकरिता ३५ लाख ६५ हजाराची ऑनलाईन निविदा मागविण्यात आलेली होती. मात्र, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद यांनी काल सोमवारी ५ एप्रिल रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्र देवून निविदा रद्द करण्याचे आदेश दिले. यावरून निविदा रद्द करण्यात आल्याने काँग्रेसचे नगरसेवक आकाश दळवी यांनी कॅनमध्ये डिझेल घेवून कारंजा चौकातील नगर परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळेतील बांधकाम विभागाचे कामकाज चालणाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेतले आणि रद्द करण्यात आलेल्या कामे त्वरित सुरू करण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी दळवी यांनी नगराध्यक्षा नजमुन्नीसा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांच्याकडून २५ ते ३० टक्के कमिशनची मागणी केली जाते. शिवाय दोन ते अडीच वर्षांपासून माझ्या प्रभागात विकास कामे केली जात नाही असा देखील आरोप केला. यावेळी बुलडाणा शहर पोलिस देखील घटनास्थळी आले. त्याच प्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक, नागरसेविका, राजकीय नेते उपस्थित होत त्यांनी नगरसेवक आकाश दळवी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आकाश दळवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. प्रथम रद्द करण्यात आलेल्या विकासकामांची रद्द करण्यात आलेल्या निविदा मंजूर करण्यात याव्या अशी मागणी लावून धरली होती.

क्लिक करा आणि वाचा-
शेवटी बुलडाणा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे कारंजा चौकातील नगर परिषद ऊर्दू उच्च प्राथमिक शाळेत पोहचून त्यांनी आकाश दळवी यांनी समजूत काढली. प्रभाग क्रमांक ११ मध्ये विकासकामे सुरू केली जातील, असे आश्वासन मिळाल्यानंतर आकाश दळवी यांनी आत्मदहनाचा निर्णय मागे घेत बंद खोलीचा दरवाजा उघडला.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here