म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार आता पुणे शहरातील सर्व दुकाने मंगळवारी, आजपासून बंद करण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. त्या दरम्यान शहरातील सर्व व्यापारी महासंघाचे सदस्य असलेल्या व्यापारी संघटनांचे ४५ वर्षापुढील कामगार, व्यापारी, त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ( decided to close all the shops in Pune)

राज्य सरकारने आपले ‘ब्रेक द चेन’ आदेश जारी केल्यानंतर आता नंतर पुणे महापालिकेने सायंकाळी सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल बंद राहतील, असे आदेश जारी केले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा वस्तूंच्या दुकानांच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यापारी, मालक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्याची सूचना महापालिकेने आदेशात केली. त्यानुसार व्यापारी महासंघाने पाऊल उचलले आहे.

राज्य सरकारपाठोपाठ पुणे महापालिकेने सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले. सरकारच्या आदेशाविरोधात आंदोलन करता येऊ शकते. त्या आदेशाचे उल्लंघन सद्यस्थितीत करणे योग्य ठरणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा-
मागील व्यापाराचे कंबरडेच मोडले होते. अनेक व्यवसाय ठप्प झाले होते, तसेच अनेकांचा रोजगार गेला होता. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन नको असे प्रत्येकाचे मत बनले होते. आता पुन्हा एकदा व्यापाऱ्यांवर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी मात्र सरकारला सहकार्य करण्याचे व्यापाऱ्यांचे धोरण असल्याचे दिसत आहे. एकीकडे व्यवसाय तोट्यात जात असताना आणि समोर सण, उत्सव असताना दुकाने बंद करण्याची वेळ येत आहे. व्यापाऱ्यांमुळे करोनाचा संसर्ग पसरत नाही. पण नाईलाजास्तव सरकार, महापालिकेच्या आदेशामुळे आम्ही मंगळवारपासून दुकाने बंद टेवण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here