टोकियो: करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी घरातून बाहेर न पडण्याचे, गर्दीचे ठिकाण टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, भर समुद्रात असलेल्या एका क्रूझवर करोनाची लागण झाली आहे. या क्रूझवर ३५०० प्रवासी आहेत. यातील १३० जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. यातील ६० जण हे नवे रुग्ण आहेत. या क्रूझवर काही भारतीय नागरिक असल्याचीही माहिती समोर आली आहे.

‘डायमंड प्रिंसेज’ क्रूझवर ही घटना घडली आहे. जपानच्या या क्रूझवर करोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याची माहिती समोर आली आहे. जपानमधील वृत्तमाध्यमांनी याची पुष्टी केली आहे. जपानच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे.

करोना व्हायरसग्रस्त क्रूझ सध्या जपानच्या योकोहामा किनाऱ्यावर आहे. क्रूझमध्ये ३५०० प्रवासी असून यात सहा प्रवासी भारतीय आहेत. तर, क्रूझच्या कर्मचाऱ्यांमध्येही काही भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती जपानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.

दरम्यान, रविवारी क्रूझच्या व्यवस्थापनाने करोना व्हायरसची लागण झालेल्या प्रवाशांमध्ये २१ जपानी, पाच ऑस्ट्रेलियन आणि पाच कॅनेडियन नागरिकांचा समावेश असल्याचे म्हटले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here