या भूकंपाचं केंद्र हे सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून २५ किमी अंतरावर भारत-भूतान सीमेवर होतं. भूकंपाचे धक्के हे रात्री ८ वाजून ४९ मिनिटांनी जाणवले. त्याआधी सोमवारी दिवसा हिमाचल प्रदेशच्या चंबा आणि लाहौल स्पितीमध्ये भूकंप झाला होता.
भूकंपाच्या धक्क्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः संबंधि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन भूकंपनाने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पंतप्रधान मोदी यांनी बिहार, आसाम आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बिहारमधील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आपल्या भागांमध्ये कुठली हानी झाली आहे का? याचा आढावा घेण्यास त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी नितीशकुमार यांना फोन करून स्थितीची माहिती घेल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times