नक्षलवाद्यांनी सोमवारी माध्यमांच्या काही प्रतिनिधींना फोन करून बेपत्ता जवान आमच्या ताब्यात आसल्याचा दावा केला. तसंच राजेश्वर सिंह यांना कुठलीही इजा करणार नाही. पण त्यांच्या सुटकेसाठी काही अटी ठेवल्या आहेत. यानंतर राजेश्वर सिंह यांचे कुटुंबीय माध्यमांशी बोलले होते.
बेपत्ता कमांडोच्या पत्नीने नक्षलवाद्यांच्या अटी पूर्ण करण्याचे आवाहन रत आपल्या पतीची सुरक्षित सुटका करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता आपलं पतीशी शेवटचं बोलणं झालं होतं. मी मोहीमेवर जात आहे. जेवण बांधून घेतोय. मोहीमेवरून परतल्यानंतर शनिवारी बोलू, असं ते म्हणाल्याचं जवनाच्या पत्नीने सांगितलं.
बेपत्ता जवान राजेश्वर सिंह यांच्या आईनेही मुलाच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींना आवाहन केलं आहे. आपल्याला मुलाशिवाय कुणाचाच आधार नाहीए. सरकारने कुठल्याही परिस्थितीत त्याची सुटका करावी, असं त्यांनी म्हटलंय.
छत्तीसगडमधील आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी बेपत्ता कमांडोच्या मुलीचा हा भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती रडत आपल्या वडिलांना परत येण्याचं आवाहन करताना दिसते आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times