करोनाशी लढण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या ‘मिशन ब्रेक द चेन’ बाबत ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. भाजपसह मनसेचा लॉकडाऊनला तीव्र विरोध होता. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी लोकांच्या पोटापाण्याची सोय करावी अशी या पक्षांची मागणी होती. त्यामुळं सरकारनं एखादा निर्णय घेतल्यास हे पक्ष सहकार्य करणार का, याबाबत संभ्रम होता. या पक्षांनी विरोधाची भूमिका सोडली नसती तर लॉकडाऊनचा फायदा झाला नसताच, शिवाय कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली असती. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: फडणवीस व राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर सरकारनं लॉकडाऊन जाहीर केल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
जमावबंदी व संचारबंदीची चर्चा एकीकडं सुरू असतानाही लोकांमध्ये असलेल्या बेफिकीरीबद्दलही शिवसेनेनं चिंता व्यक्त केली आहे. ‘एका बाजूला कोरोना भयानक पद्धतीने वाढतो आहे, त्याच वेळेला रविवारी संध्याकाळी जुहूच्या चौपाटीवर कशी प्रचंड गर्दी उसळल्याचं दिसलं. पुण्यातील मंडया आणि बाजारपेठांत पाय ठेवायला जागा नाही. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनाही समोरची विनामुखपट्टय़ांची अतिउत्साही गर्दी पाहून स्वतःच्या नाकातोंडावरील ‘पट्टी’ काढून भाषण करण्याचा मोह आवरला नाही. समोरच्या गर्दीत करोना चिरडून मेला असेच बहुतेक पुढाऱ्यांना वाटू लागले आहे. तिकडे पश्चिम बंगालातही निवडणूक प्रचाराची रणधुमाळी पाहता तेथेही त्यात कोरोना चिरडला गेला आहे का, अशी शंका येते, असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
मोदी हे परमेश्वराचे अवतार नाहीत!
‘पंतप्रधान मोदी, तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात काय?’ असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी त्राग्याने विचारला तो खराच आहे. मोदी हे नक्कीच परमेश्वराचे अवतार नाहीत. तसे असते तर त्यांनीही जादूच्या छडीने छुमंतर करून करोनाचा पराभव केला असता’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times