मुंबई: छोट्या पडद्यावरची ‘लागिरं झालं जी’ या मालिकेनं निरोप घेऊन अनेक महिने झाले असले तरी या मालिकेतील कलाकारांची क्रेझ कमी होताना दिसत नाहीए. मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी शिवानी बावकर असो किंवा मग भय्यासाहेब सर्वांचाच चाहता वर्ग मोठा आहे. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे मालिकेत मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता हा देखील प्रेक्षकांमध्ये तितकाच प्रसिद्ध आहे.

नितीश चव्हाणला टिकटॉकची प्रचंड क्रेझ असून त्याचे टिकटॉकवर देखील हजारो फॉलोअर्स आहेत. तो वरचेवर अनेक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या टिकटॉक व्हिडिओमुळं त्याची चर्चा सुरू असून या व्हिडिओत नितीशसोबत एक तरुणी असते. त्यामुळं ही तरुणी नक्की कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
वाचा:

काही महिन्यांपूर्वी नितीशनं एक फोटो शेअर केला होता. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये ‘तिच्या’बद्दल चर्चा सुरू होती .फोटोमध्ये नितीशसोबत जी सुंदर मुलगी दिसते आहे तिचं नाव आहे श्वेता खरात. नितीश चव्हाण आणि हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यामुळं श्वेता आणि नितीशचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावरील अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडिओतून नितीश आणि श्वेता यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

श्वेता सध्या ‘राजा राणीची गा जोडी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नितीश मात्र मालिकांमधून दूर गेल्याचं पाहयला मिळत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here