यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला आहे. आज मंत्रालयात दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच जयंत पाटील यांनी एक ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘माझे जुने मित्र नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता गृहमंत्री या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
कोण आहेत दिलीप वळसे पाटील?
दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा विधानसभेवर निवडून गेले असून विधिमंडळाच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे. कधीकाळी शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले दिलीप वळसे सध्या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. वळसे यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा या खात्यांचे मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times