या बरोबरच आज दिवसभरात मुंबईतील एकण ७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाख ८२ हजार ४ इतकी झाली आहे. या बरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ८१ टक्के इतका झाला आहे.
मुंबईत एकूण ७७ हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू
मुंबईतील सक्रिय रुग्णांची, अर्थात ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या ७७ हजार ४९५ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत रुग्णदुपटीचा दर ३८ दिवसांवर
मुंबईत आज मृत्यू पावलेल्या ३१ करोना बाधित रुग्णांपैकी १९ जणांना दीर्घकालीन आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या मृतांमध्ये २० पुरुषांचा, तर ११ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईतील करोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३८ दिवसांवर आला आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८१ टक्के इतका आहे. ३० मार्च ते ५ एप्रिल या आठवड्याच्या कालावधीत रुग्णवाढीचा दर १.७९ टक्के इतका आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times