अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे हे बुलडाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आखून दिलेल्या नियमानुसारच रुग्णांना दिले जावे अशा सूचना आपण दिल्या असल्याचे शिंगणे म्हणाले. काही खाजगी डॉक्टर रुग्ण दवाखान्यात दाखल होताच त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन देतात. नियमाप्रमाणे एका रुग्णाला फक्त ६ इंजेक्शन द्यायचे असतात. इंजेक्शनचा साठा लक्षात घेता ज्यांना आवश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे, अशा सूचनाही डॉक्टरांना देण्यात येणार आल्याचे त्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
खाजगी डॉक्टर कोरोना उपचारासाठी काही रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. याबाबत डॉ. शिंगणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, खाजगी रुग्णालयांसाठी एक दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्या दरपत्रकानुसारच रुग्णांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. रुग्णांनी बरे झाल्यानंतर डॉक्टरांना पैसे देण्यापूर्वी बिलाची तपासणी करावी. आकारण्यात आलेले पैसे बरोबर आहेत का याची खात्री करन घ्यावे आणि मगच पैसे द्यावेत असे आवाहनही यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times