महापौर किशोरी पेडणेकर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. मुंबईत दररोज ५० हजार व्यक्तींना प्रतिबंधत लशींचे डोस दिले जात आहेत. याबरोबरच मुंबईतच्या जम्बो कोविड सेंटर्समध्ये दिवसाला दीड ते दोन हजार लसींचे डोस दिले जात आहेत अशी माहिती, महापौर पेडणेकर यांनी दिली. लशीच्या साठ्याबाबत माहिती देताना पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत कोविशिल्ड लशीचे एकूण १ लाख ७६ हजार ५४० डोस शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिन या लशीचे ८ हजार ८४० डोस शिल्लक आहेत. हे पाहता येत्या २ ते ३ दिवसांमध्ये मुंबईत लशीचा तुटवडा निर्माण होईल.
क्लिक करा आणि वाचा-
केंद्र सरकारवर केली टीका
महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकार राज्याला सापत्न वागणूक देत असल्याची टीका केली आहे. मुंबईत असलेला लशीचा साठा येत्या २ ते ३ दिवस पुरेल इतकाच आहे. पुढील लशीचा साठा १५ एप्रिलनंतरच येणार आहे. मग तोपर्यंत करायचं काय हा प्रश्न आहे असे सांगतानाच सह्याद्रीला नेहमीच केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक दिली जात आहे, अशा शब्दांत महापौरांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
क्लिक करा आणि वाचा-
‘वरवर माया आणि पोटभर जेव ग बया’, असेच काहीसे केंद्र सरकारचे सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या. आम्हाला जलद लसीकरण करायचे आहे. मात्र त्यासाठी आम्हाला लशीचा साठा मिळायला पाहिजे. आम्ही सगळे नियम पाळत आहोत, असे ही त्या पुढे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लशीच्या साठ्याची मागणी केलेली आहे. राज्य सरकार पत्र देखील पाठवत आहे. तरी आम्हाला लस मिळत नाही, असा तक्रारीचा सूर महापौरांनी लावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times