सिंधुदुर्ग: राज्य सरकारने करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन दिवसा जमावबंदीचे आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यात शहरी भागांत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे. व यांनी पोलिसांच्या मदतीने आज बाजारपेठेत कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी जबरदस्ती दुकाने बंद करायला लावल्याने शहरातील काही भागांत वातावरण तापलं होतं. व्यापारी व दुकानदारांचा विरोध लक्षात घेऊन बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ( )

वाचा:

कणकवली शहरात प्रामुख्याने मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तिथे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तावर आहे. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जे आदेश काढले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वाचा:

कणकवली शहरात भरणारा आठवडा बाजार पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश नगराध्यक्ष यांनी दिले होते. असे असतानाही आज मोठ्या प्रमाणात कणकवलीतील बाजारपेठत दुकाने सुरूच होती तर नागरीकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. त्यामुळेच नगर परिषद व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाईबाबत नंतर समीर नलावडे यांनीही माहिती दिली असून आदेश मोडणाऱ्या संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. आज व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यातही आवश्यकत्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्लेसह अन्य शहरांतही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून जमावबंदी व संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here