अकोला: करोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सरकारनेही नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, अकोल्यातील व्यापाऱ्यांनी या कडक निर्बंधांना विरोध दर्शवला आहे. रस्त्यावर गर्दी आहे, बसेस मध्ये गर्दी आहे, मग आमच्याच दुकानांमुळे करोना होतो का?, असा सवाल जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी केला आहे. अकोल्यात आज पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ( oppose the strict restrictions imposed by the state government under )

आज पासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे करोनाची साखळी तुटण्यास मदत होणार नाही. नागरिक रस्त्यावर फिरतच आहेत. बाजारपेठ, भाजी बाजार,अत्यावश्यक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तर मग आमच्या आस्थापना बंद ठेवल्याने कोरोना कमी होणार का?, असा प्रश्न व्यापारी उपस्थित करत आहेत.

शासनाने संपूर्ण राज्‍यामध्‍ये कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून ३० एप्रिल २०२१ पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. अकोला जिल्हात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने निर्गमित केलेल्या आदेशान्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात ३० एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ३० एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी जारी करण्यात आली आहे. याबरोबरच ३० एप्रिलपर्यंत शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत मुक्त संचारास मनाई असेल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ”अंतर्गत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, संपूर्ण अकोला जिल्ह्याकरीता ५ एप्रिलच्या रात्री आठ वाजेपासून ते ३० एप्रिलच्या रात्रीपर्यंत सुधारित आदेश पारीत करण्यात आले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
गेल्या वर्षभरात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांची स्थिती खालावली होती. व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून व्यापारी कर्जबाजारी झालेले आहेत. आस्थापने बंद असतांनाही बँकेचे व्याज सुरु असून वेळेवर हप्ता भरावाच लागतो. त्यामुळे व्यापारी व व्यापाऱ्याकडे काम करणाऱ्या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. व्यापाऱ्यांबरोबरच तिथे काम करणाऱ्या कामगारांवर देखील उपासमारीची वेळ आली तर आश्चर्य वाटायचा नको.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here