नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२१ मधील भारताच्या विकासाच्या अंदाज ( ) वर्तवला आहे. भारतीय अर्थव्यवस्था यंदाच्या वर्षात वेगाने धावणार आहे. २०२१ मध्ये भारताचा आर्थिक विकासदर हा १२.५ टक्के इतका असेल, असा अंदाज नाणेनिधीने वर्तवला आहे. एवढंच नाही भारत यंदाच्या वर्षात चीनलाही मागे टाकेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे.

भारतापेक्षा चीनची अर्थव्यवस्था ही मोठी आहे. करोना संकटाच्या काळात जगात फक्त चीनची आर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत होती. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था सकारात्मक स्थितीत होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल २०२२ चाही अंदाज वर्तवला आहे. २०२२ मध्ये हा ६.९ टक्के म्हणजे जवळपास ७ टक्के असेल, असं नाणेनिधीने म्हटलं आहे. जागितक बँकेसोबत होणाऱ्या वार्षिक बैठकीपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यासंदर्भातला अहवाल जाहीर केला आहे.

२०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत विक्रमी ८ टक्क्यांची घसरण झाली. पण आता या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर हा १२.५ टक्के असेल. हा विकास दर चीन पेक्षाही खूप चांगला आहे. यावर्षी २०२१ मध्ये चीनचा आर्थिक विकास दर हा ८.६ टक्के आणि २०२२ मध्ये ५.६ टक्के इतका असेल, असा नाणेनिधीचा अंदाज आहे. गेल्या वर्षी चीनचा आर्थिक विकास दर हा २.३ टक्के इतका होता. जो करोना संकटाच्या काळात सकारात्मक होता. करोना संकटातही सकारात्मक विकास दर राखणारा चीन हा जगातील एकमेव देश होता.

यंदा जागतिक अर्थव्यवस्थाही अधिक बळकट होणार आहे. २०२१ मध्ये जागतिक आर्थव्यवस्थेचा विकास दर हा ६ टक्के आणि २०२२ मध्ये ४.४ टक्के इतका असण्याची शक्यता आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितलं.

करोना संकटामुळे अजूनही आर्थिक नुकसानीची भीती

करोना संकटामुळे जागितक अर्थव्यवस्थेत ३.३ टक्के इतकी घसरण झाली होती. अजूनही अनेक करोनाचे संकट जगावर कायम आहे. यामुळे आर्थिक नुकसानीचा धोकाही कायम आहे. यामुळे आपल्या समोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहेत, असं गीता गोपीनाथ म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here