नांदेड: जिल्ह्यात दररोज साधारणपणे हजाराच्या आसपास रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. या मुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून करोना रोखण्याचे आव्हानच प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. येथील करोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून दुसरीकडे वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याचाही जिल्हा प्रशानाचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाने आता वाढती पॉझिटिव्ह रुग्णसंख्या लक्षात घेऊन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (the has decided to set up a in nanded)

काल मंगळवारी १०६२ इतकी रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह आली असून आज २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आजच जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक नीलकंठ भोसीकर यांनी शहरातील काही मंगल कार्यालयाची पाहणी केली असून येत्या दोन दिवसात जम्बो कोव्हिड सेंटर उभारणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिलीय.

क्लिक करा आणि वाचा-
या जम्बो कोविड सेंटरमध्ये एकाचवेळी जवळपास दोन हजाराच्या आसपास रुग्णावर उपचार करता येणार आहेत. तसेच यात व्हेंटिलेटर, सर्व सोयींनीशी बेड, भोजन व्यवस्था ,अनुभवी डॉक्टर्स व उपचार सामुग्री सह सज्ज असेल. त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला अशी कुठली लक्षणे आढळल्यास त्वरित कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत ,लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय.

क्लिक करा आणि वाचा-
देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये राज्यातील एकूण ९ शहरांचा समावेश करण्यात आला. यात नांदेडचाही समावेश आहे. या बरोबरच नांदेड जिल्हा राज्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. यामुळेच २४ मार्च या दिवशी नांदेडमध्ये १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here