वाचा:
राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध आणि प्रत्येक आठवड्याच्या शेवटी दोन दिवस टाळेबंदी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील स्थितीवर आपलं मत मांडलं आहे. मध्यंतरी अमरावती शहरासह जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळल्याने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून टाळेबंदी करण्याची आवश्यकता नाही, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी राज्य शासनाने लावलेले निर्बंध शिथील करण्यात यावे या मागणीसाठी यशोमती ठाकूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून मंगळवारीच त्या मुंबईला रवाना झाल्यात असे ठाकूर यांचे माध्यम सल्लागार प्रवीण ठाकूर यांनी सांगितले.
वाचा:
पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून जिल्ह्यातील परिस्थितीची त्यांना माहिती देणार आहेत. राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांपैकी जिल्हयात शनिवार-रविवारसाठी जनता कर्फ्यू मान्य असून सोमवार ते शुक्रवार लावण्यात आलेले निर्बंध शिथील करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहितीही विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times