नवी दिल्लीः पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही ४ राज्ये आणि पदुच्चेरी या एका केंद्र शासित प्रदेशात मंगळवारी मतदान झालं. एकूण ४७५ मतदानसंघासाठी हे मतदान झालं. १.५ लाख मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार इशान्येतील आसाममध्ये तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ७८.४९ टक्के मतदान झालं. तर पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७७.६८ टक्के मतदान झालं. राज्यात मतदानाचे आणखी ५ टप्पे बाकी आहेत. दुसरीकडे केरळमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६९.९५ टक्के मतदान झालं. तामिळनाडूत ६३.४७ टक्के आणि पुदुच्चेरीत ७७.९० टक्के मतदान झालं. या तिन्ही विधानसभांसाठी एकाच टप्प्यात मतदान झालं.

पश्चिम बंगाल आणि आसाममधील काही किरकोळ घटना वगळता कुठल्याही मोठ्या अनुचित प्रकाराची सूचना नाही, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. यादरम्यान काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. राज्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७७.६८ क्के मतदान झाल्याची माहिती दिली.

पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यात गोघाट येथे एका भाजप समर्थकाच्या आईला बेदम मारहाण करत तिची हत्या केली गेली. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केलीय. आणखी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

आसाममध्ये काही ठिकाणी झडप

आसाममध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात १२ जिल्ह्यांमध्ये ४० मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ६ वाजता ७८.९४ टक्के मतदान झालं. हिसेंच्या काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झालं. गोलकगंजच्या दिगमतरीमद्ये एका मतदान केंद्रावर दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीमार करत आणि हवेत गोळीबार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here