मुंबई: संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण राज्यात मिशन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअनुषंगाने मोठा निर्णय घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी राज्यात ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले. ( Chhagan Bhujbal On )

वाचा:

करोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार ठरत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

वाचा:

थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल नाही

सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच ५ रुपयांत शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी नमूद केले. करोनाच्या या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारने “ब्रेक द चेन” या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण करोनाला रोखू शकतो. त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here