मुंबईः मुंबईत करोना संसर्गाचा जोर वाढला आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवून देण्यासाठी अनेक रुग्णालयात धावपळ करावी लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार या एका रुग्णाच्या मदतीला धावून आल्या आहेत. सुप्रिया सुळेंचं हे ट्वीट व्हायरल होत आहे.

मुंबईत करोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयातही बेड अपुरे पडत असल्याचं चित्र आहे. चेंबुर येथे राहणाऱ्या ६८ वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या रुग्णाला किडनी आणि हृदयविकारसंबंधितही आजार होते. या रुग्णाची प्रकृती अत्यावस्थ असून त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांना मुंबईत आयसीयू बेड शोधण्यात अपयश येत होतं.

अनेक प्रयत्न करुनही रुग्णाच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेड मिळत नसल्याचं चित्र होतं. यानंतर एका तरुणीनं ट्विटरच्या माध्यमातून बीएमसीकडे मदत मागितली. या तरुणीच्या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लगेचच प्रतिसाद देत मदतीला धावून आल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी तरुणीच्या ट्वीटला उत्तर देत बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरला ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. तसंच, तिथल्या कोविड सेंटरच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या ट्वीटला उत्तर देताना या तरुणीनं सर्वांचे आभार मानले आहेत, व रुग्णाला बेड मिळाल्याची माहितीही दिली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्यासह पर्यावरण मंत्री यांनीही या तरुणीच्या ट्वीटची तात्काळ दखल घेत महापालिकेला बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनीही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टॅग करत मदत करण्याचं आवाहन केलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here