मुंबई: पूर्व उपनगरातील सीएसटी रोडवर मोटर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतही माहिती मिळालेली नाही. (fire breaks out in a scrap godown in kurla area in mumbai)

या आगीच्या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम इथे असलेल्या गुरुद्वाराजवळ एक स्क्रॅप मार्केटच्या गोदामात ही आग लागली आहे. या आगीमुळे आसपास धुराचे लोळ दिसू लागले. हे धुराचे लोळ काही किलोमीटरच्या अंतरावरूनही सहज पाहता येतात, यावरून ही आग किती मोठी आहे याची कल्पना येते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here