अमरावती जिल्ह्यात मध्यंतरी करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांनी टाळेबंदीला प्रचंड प्रतिसाद दिला. मात्र सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्यानं टाळेबंदीचे निर्बंध शिथील करा, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन केली आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवण्यात आला आहे. त्यावर विचार होऊन लवकरच निर्णय होईल, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. ()
वाचा:
राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारच्या वतीने अंशत: टाळेबंदी जाहीर करण्यात आली. मध्यंतरी शहरासह जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठ्या प्रमाणात करोनाचे रुग्ण आढळल्याने टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असून टाळेबंदी करण्याची आवश्यकता नाही. राज्य शासनाने लावलेले निर्बंध शिथील करण्यात यावे, अशी सर्वांचीच मागणी आहे.
वाचा:
राज्य सरकारने एका महिन्याचे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी व कामगार वर्गामध्ये नाराजी आहे. अनेक ठिकाणी निवेदने सुद्धा देण्यात आली. सध्या शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात असून मृत्युदर सुद्धा कमी आहे. मध्यंतरी लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे करोनाला आळा घालण्यात काही प्रमाणात यश आलं आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली. राज्य सरकारनं घालून दिलेल्या निर्बंधांपैकी जिल्ह्यात शनिवार-रविवारचा जनता कर्फ्यू मान्य आहे. मात्र, सोमवार ते शुक्रवार लावण्यात आलेले निर्बंध शिथील करायला हवेत, असं मत ठाकूर यांनी या भेटीत मांडलं. या भेटीतील चर्चेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असून त्यावर काय निर्णय होतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times