वाचा:
बॉलीवूडमधील चित्रपट निर्माते हे पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी हिच्यासह अंधेरी डी. एन. नगर परिसरात वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी त्यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज तसेच धूर येऊ लागताच शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दल आणि डी. एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी अस्मिता आणि सृष्टी यांना आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचे दिसले. आगीवर नियंत्रण मिळवत गंभीररित्या भाजलेल्या दोघींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र अस्मिता यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर सृष्टी ७० टक्के भाजल्याने तिला ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.
वाचा:
डी. एन. नगर पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. ५५ वर्षीय अस्मिता यांना किडनीचा आजार होता. या आजाराला त्या कंटाळल्या होत्या. तर दुसरीकडे आईचे हाल पाहून सृष्टी व्यथित व्हायची. त्यामुळे दोघांनी हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times