म. टा. प्रतिनिधी,

राज्य सरकारपाठोपाठ पुणे महापालिकेने शहरात जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाचा पुण्यातील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. शहरातील सर्व दुकाने सुरु करण्याची परवानगी द्यावी यासाठी पुणे व्यापारी महासंघासह पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे. ( strongly oppose and sent letter to cm)

‘गेल्या वर्षी तोट्यात गेलेला व्यापार आता सुरळीत होत असताना पुन्हा लागले. व्यापाऱ्यांमुळे करोना वाढतो अशी ओरड केली जाते. पण शहरात अनेक कारखाने, पेट्रोलपंप, रिक्षा, खाद्यपदार्थ, स्टॉल्सवर गर्दी आहे. तसेच दिवसा पाच व्यक्तींना एकत्र फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने लादली पाहिजे त्यांना बंधने न घालता केवळ व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे. एप्रिल, मे महिन्यात रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुढीपाडवा, अक्षयतृतीया यासारखे महत्वाचे सण आहे. २५ दिवसांच्या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीचा विचार सरकारने करावा,’ अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

व्यापारी महासंघाने मंगळवारी दिला होता पाठिंबा
राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरातील सर्व दुकाने मंगळवारी बंद करण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला होता. राज्य सरकारने आपले ‘ब्रेक द चेन’ आदेश जारी केल्यानंतर लगेचच पुणे महापालिकेने सर्व दुकाने, मार्केट व मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यात अत्यावश्यक सेवा वस्तूंच्या दुकानांच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यापारी, मालक, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्याची सूचना महापालिकेने केली. त्यानुसार व्यापारी महासंघाने प्रतिसाद दिला

क्लिक करा आणि वाचा-
सरकारच्या आदेश योग्य नाही असे वाटत असेल तर त्या विरोधात आंदोलन करता येऊ शकते. त्या आदेशाचे उल्लंघन सद्यस्थितीत करणे योग्य होणार नाही, असे व्यापारी संघटनांनी म्हटलेले होते.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here