अकोला: अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हा शासकीय महाविद्यालयात रुग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याने कॅन्टीनमध्ये जात तपासणी केली व याच मेसमध्ये असलेल्या सुनील मोरे या कंत्राटी स्वयंपाक्याच्या कानाखाली मारले. ही बाब संतापजनक असून आघाडी सरकारच्या मंत्र्यांची पातळी सोडून दादागिरी सुरू असल्याचा पुरावाच आहे, असा आरोप प्रदेश महासचिव यांनी केला आहे. स्वयंपाक्याच्या कानाखाली मारणे सोपे असते. गोरगरीब माणसाला मारून व्यवस्था बदलत नाही तर व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस पालकमंत्र्यानी दाखवावे असे आव्हानच पातोडे यांनी दिले आहे. ( Latest News )

वाचा:

पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांनी सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी दादागिरी करणे अपेक्षित आहे. मात्र पालकमंत्री दादागिरी करताहेत ती सामान्य माणसावर. ज्या कॅन्टीनमध्ये हा प्रकार घडला ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक साहेबराव कुलमेथे यांच्या अखत्यारित आहे. त्यांना कडू यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी २३ किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्न नंतर पालकमंत्र्यांनी स्वयंपाकी सुनील मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. मग चूक कुणाची होती? जास्त डाळ लागत असल्याचे उत्तर व्यवस्थापकाने दिले होते, अशावेळी गरीब स्वयंपाक्याला मारणे ही गुंडगिरी कशासाठी आहे, याचे उत्तर पालकमंत्री देतील का? असा सवालही वंचित युवा आघाडीने केला आहे.

वाचा:

येथे खोकल्यासह अनेक औषधांचा तुटवडा आहे. मनुष्यबळाचाही तुटवडा आहे. उपचार आणि विलगीकरणासाठी मान्यता दिलेल्या खासगी हॉस्पिटल तसेच काही हॉटेल्समध्ये मोठे शुल्क आकारले जात आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यासोबत एमओयू केले असेल तर तो सार्वजनिक का केला जात नाही? लसीकरण करण्यासाठी उपलब्ध लसीचा साठा दोन दिवसांत संपणार आहे, ऑक्सीजन प्लांट सुरू होत नाहीय, या सर्वासाठी अशी हाणामारी कधी करणार आहात?, याचा खुलासा पालकमंत्र्यांनी करावा, असे आवाहनही पातोडे यांनी केले.

वाचा:

कॅन्टीनमधील निकृष्ट जेवणासाठी मारहाण केलीय, त्या कॅन्टीनचा तपासणी अहवाल अन्न सुरक्षा व मानके कायदे २००६ अंतर्गत १९, २६ आणि २९ जून २०२० रोजी सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांनी दिला होता. अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे आणि गोरे यांनी दिलेल्या अहवालात कॅन्टीनमधील अन्न पदार्थ खाऊन बघितले असता, ते ताजे व पौष्टिक तथा दर्जेदार आहे, रुग्णांना पॅकेज ड्रिंकींग वॉटर पुरविले जाते, अन्न पदार्थ हाताळणी करणारे कामगार अॅप्रन, टोपी व हॅन्डग्लोज घालत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे चारही तपासणी अहवाल छापील स्वरूपात आहेत. त्यातला मराठी मजकूर नीट वाचताही येत नाही. अयोग्य अन्न पदार्थांबाबत नोंदीचा पर्यायही त्यात नाही. त्यामुळेच असा बनावट तपासणी अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली कधी वाजवली जाईल?, असा सवालही त्यांनी केला.

अकोला पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोविड रुग्ण असताना मनपाच्या वतीने त्याचा कोणताही पाठपुरावा घेतला जात नाही. शहरात नीट सॅनिटायझेशन केले जात नाही. विलगीकरणात असलेल्या रुग्णांची पडताळणी होत नाही. अनेक पॉझिटिव्ह रुग्ण तर घरीच राहून उपचार घेत होते. या सगळ्या भोंगळ कारभाराला जे अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्या कानाखाली कधी आवाज काढणार आहात? या सगळ्या तारखा देखील जाहीर करा, असे आव्हानही राजेंद्र पातोडे यांनी दिले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here