सोलापूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. मंगळवेढा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन अरुण शिंदे यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन करण्यात येत आहे. येथील सभांना संघटनेचे नेते हजेरी लावत वातावरण निर्मिती करण्याचे काम करत आहेत. ही पोटनिवडणूक म्हणजे कारखानदार विरुद्ध सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अशी लढाई आहे. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची ऊस बिले न दिल्यामुळे तसेच वीजबिल वसुलीसाठी लाईट बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक लावण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये शेतकऱ्यांची साथ मिळत आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. (this is the son against the factory owner says )

मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ, खुपसंगी, शिरशी, जुनोनी, हिवरगाव, तळसंगी या गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन अरुण शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुपकर बोलत होते.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन उभं करण्यात येईल असे आश्वासन दिले. या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रमाणे कष्टकरी आणि शेतमजुरांचे देखील प्रश्न आहेत. या सर्व घटकांचे प्रश्न स्वाभिमानी मार्गी लावेल, असे तुपकर म्हणाले. स्वाभिमानी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. दूध दरवाढ यासह विजेच्या प्रश्नावरही संघटनेने आवाज उठवला आहे,असेही तुपकर यांनी आवर्जून सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी स्वाभिमानी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, उमेदवार सचिन शिंदे,युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,दत्ता गणपाटील, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार विश्रांती भुसनर,आणि अमोल शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here