डेरा बाबा नानकः ओडिशातील एका महिलेला पाकिस्तानमधील तरुणावर प्रेम जडलं. या महिलेला ५ वर्षांची मुलगी आहे. पण ती पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात इतकी अंधळी झाली की ती सीमा ओलांडून पाकिस्तानात जायला निघाली होती. ती पंजाबमधील डेरा बाबा नानक साहिममध्ये भारत-पाक सीमेवर पोहोचली. ती करतारपूर कॉरिडोरहून पाकिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात होती. पण कॉरिडोर बंद असल्यानं ती सापडली. महिलेसोबत तिची मुलगीही होती.

या महिलेकडे २५ तोळे सोन्याचे दागिने आढळून आले. यानंतर पोलिसांनी ओडिशामधील या महिलेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. ती विमानाने अमृतसरमध्ये आली. तिथून सीमाभागात दाखल झाली. चौकशीनंतर महिला आणि तिच्या ५ वर्षांच्या मुलीला कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं. करतारपूर कॉरिडोर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानातील आपल्या प्रेमीला भेटण्याचा प्रयत्न करण्याचं हे दुसरं प्रकरण आहे.
बीएसएफने ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यातील एका गावातली २५ वर्षीय महिला आणि तिच्या ५ वर्षांच्या एका मुलीला डेरा बाबा नानक पोलिस ठाण्याच्या हवाली केलं. ही माहिला करतारपूर कॉरिडोर मार्गे पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होती. पण कॉरिडोर सध्या बंद असल्याने बीएसएफ जवानांनी तिला अडवलं. यानंतर त्यांनी महिला आणि तिच्या मुलीला पोलिसांच्या हवाली केलं, अशी माहिती डीएसपी कंवलप्रीत सिंग यांनी दिली.

महिलेकडे २५ तोळे सोन्याचे दागिने आणि ६० ग्रॅम चांदी आणि तीन एटीएम कार्ड आढळून आले. यामुळे आम्हाला तिच्यावर संशय आला. चौकशी केल्यानंतर तिने सगळं खरं सांगितलं. जवळपास दोन वर्षांपूर्वी तिने आपल्या मोबाइलवर आयार अॅप (izar) डाउनलोड केलं होतं. यानंतर पाकिस्तानमधील एका व्यक्तीशी तिची मैत्री झाली आणि ती व्हिडिओ चॅटिंग करू लागली. दो महिन्यांपूर्वी ही माहिला सासरहून भूवनेश्वरला आपल्या माहेरी आली. यानंतर तिने अॅपवरून पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या मोहम्मद वक्कारशी बोलणं सुरू केलं. यानंतर दोघांनी आपले व्हॉट्सअॅप नंबर एकमेकांना दिले. यातून ती त्या पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याला भेटण्याचं तिने ठरवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here