नवी दिल्लीः टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात चीन भारताच्या पुढे आहे आणि त्याच्याकडे सायबर हल्ल्याची क्षमता आहे. दोन्ही देशात सर्वाधिक फरक हा सायबर क्षेत्रात आहे. तो दूर करण्यासाठी गंभीर प्रयत्न केले जात आहेत, असं सीडीएस जनरल बिपीन रावत म्हणाले. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनच्या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं.

चीन आपल्यावर सायबर हल्ले करण्यात सक्षम आहे. हे आपण जाणून आहोत. ते आपल्या यंत्रणेचं मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवू शकतात. उलथा-पालथ घडवू शकतो. यामुळे भारत अशा प्रकारच्या हल्ले परतवून लावण्यासाठी सायबर डिफेन्स सिस्टम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा हल्ल्यांच्या स्थितीत डाउनटाइम आणि सायबर हल्ल्याचा परिणाम दीर्घ राहू नये यासाठी लष्कराच्या सायबर यंत्रणा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती रावत यांनी दिली.

देशाची सुरक्षा आणि सन्मानावर विनाकारण झालेल्या हल्ल्यावेळी भारताच्या नेतृत्वाने राष्ट्रीय हितांचे रक्षण करून राजकीय इच्छाशक्ती आणि दृढ निश्चयाचे प्रदर्शन केले आहे, असं रावत म्हणाले. पूर्व लडाखमध्ये चीनशी सुरू असलेल्या तणावाशी त्यांचं हे वक्तव्य जोडलं जातंय. देश प्रत्यक्ष युद्धासह हायब्रिड आणि अपारंपरिक युद्धापर्यंत सुरक्षेचे धोके आणि आव्हानांचा सामना करत आहे, असं सीडीएस रावत यांनी सांगितलं.

प्रभावी कूटनीती आणि पुरेशा सुरक्षा क्षमतांद्वारे भारतावरील बाह्य हल्ल्यांचा सामना करता येऊ शकतो. बळकट राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक विकास, सामाजिक सौहार्द, प्रभावी कायदा सुव्यवस्था तंत्र हे अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, असं सीडीएस जनरल रावत म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here