एकीकडे सोलापुरात रेमडीसीविर इंजेक्शनसाठी कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक रात्र-रात्र जागून काढत आहेत. काही मेडिकल चालकांकडे असलेला साठाही संपला आहे. तर दुसरीकडे नफेखोर मेडिकल चालक काळ्या बाजारात चढ्या भावाने रेमडीसीविर इंजेक्शनची विक्री करत आहेत. या वैद्यकीय क्षेत्रातील काळ्या कमाईचा एक नमुना बार्शीत उघडकीस आला आहे. स्टिंग करणारे ठक्कर यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे नामदेव भालेराव यांच्याकडे रीतसर तक्रार केली असून हा व्हिडीओही त्यांना पाठवल्याचे सामाजिक कार्यकर्ते व होलसेल औषध विक्रेते राजन ठक्कर यांनी मटा ऑनलाइनशी बोलताना सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
सदर स्टिंगमध्ये दिसणारा औषध विक्रेता रेमडीसीविर इंजेक्शन आत जाऊन डॉक्टरांची परवानगी घेऊन येतो. शिवाय गरजवंत आपल्याकडे तीनच हजार रुपये असल्याचे सांगताच साध्य कागदावर लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी फेकून देतो आणि शेवटी ४ हजार रुपये दिल्यानंतर बिल न देण्याच्या अटीवर इंजेक्शन देत आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे अॅप्रन घातलेला ज्ञानेश्वर नामक विक्रेता हा फार्मासिस्ट नसून केवळ काळबाजार करण्यासाठी खुद्द डॉक्टरांनी बसविलेला व्यक्ती असल्याचेही ठक्कर यांनी सांगितले आहे. यापुढेही आपण तहसीलदार आणि बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे ठक्कर म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
शहर – जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात रेमडीसीविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्याचाच फायदा साठेबाज मेडिकल चालक काळ्या कमाई करण्यासाठी घेत आहेत. हे या घटनेवरुन सिद्ध झाले आहे. त्यामुळं यापुढच्या काळात अन्न व औषध प्रशासनाला छापेमारीबरोबरच कडक कारवाईचा बडगा उचलावा लागणार आहे. तरच कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना नफेखोरीपासून दिलासा मिळणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times