सीबीडीतील माया बारचा चालक मालक असलेला वशिष्ठ यादव याचा मृतदेह सोमवारी सकाळी कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील बेलनहल्ली येथील कुक्के गावलागतच्या जंगलामध्ये आढळून आला. कर्नाटक पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले असता, त्याचा मृत्यू वायरीने गळा आवळून झाल्याचे आढळून आले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, सदर व्यक्ती हा नवी मुंबईतील सीबीडी परिसरातील माया बारचा चालक मालक असल्याचे आढळून आले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, वशिष्ठ यादव याने माया बार ज्या-ज्या लोकांना चालविण्यासाठी दिले होते, त्यातील अनेकांना त्याने कोट्यवधींचा चुना लावल्याचे समजते. त्यामुळे बारच्या आर्थिक व्यवहारात फसवणूक झालेल्या काही व्यक्तींकडून वशिष्ठ यादव याच्याकडे पैशांची मागणी देखील करण्यात येत असल्याचे समजते. याच आर्थिक वादातून वशिष्ठ यादव याला कुणीतरी कर्नाटकमधील उडपी जिल्ह्यात नेऊन त्याची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times