यासोबतच जिल्ह्यात सोयाबीन कापणीच्या वेळी आलेल्या अति पावसामुळे ८० ते ९० टक्के सोयाबीन भिजले होते. त्यामुळे उत्पादन घटले सोबतच बियाण्यांसाठी ज्या दर्जाचे सोयाबीन पाहिजे, तसे मिळाले नाही म्हणूनच येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे मुबलक राहणार नाही, सोबतच बियाण्यांच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत प्रचंड भाववाढ होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यातील खरिपाचे मुख्य असलेल्या सोयाबीनच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. बाजारात उच्च प्रतिच्या सोयाबीनला ६ हजार ३०० रुपये दर मिळाला आहे. हा भाव अमरावतीत आतापर्यंत सोयाबीनला मिळालेला सर्वोच्च दर ठरला आहे. बाजारात आता सोयाबीनचा भाव वाढला असला तरीही आवक मात्र अत्यल्प आहे. कारण यंदा शेतकऱ्यांजवळ साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी नव्हते, कारण ऐन सोयाबीन काढणीच्यावेळी जिल्ह्यात पावसाने धूम ठोकली होती. तसेच खरीप हंगामात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर जबर फटका बसला होता. तसेच सोयाबीन कापणीच्यावेळी पाऊस आला आणि बहूतांश सोयाबीनला पाणी लागले. या पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावला.
सोयाबीनचा पेरा वाढणार, बियाणे महागणार
सोयाबीन काढणीवेळीच पाऊस आला आणि सोयाबीन भिजले. त्यामुळे बाजारात उच्चप्रतीचे सोयाबीन फार कमी विक्रीसाठी आले .यंदा सोयाबीनचा पेरा वाढणारे बियाणे मात्र चांगलेच महागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळ असलेले सोयाबीन पेरावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times