सिंधुदूर्ग: अटकेत असलेले निलंबित पोलिस अधिकारी यांनी पत्रात राज्याचे मंत्री यांचे नाव घेतल्यानंतर भाजपचे आमदार यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मी पहिल्या दिवसापासून बोलत आलो आहे, की सचिन वाझे हा शिवसेनेचा किंबहुना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच माणूस आहे. आता सर्व गोष्टी उंबरठ्यावर आलेल्या आहेत. त्यांनी अनिल परब याचं नाव घेतलेलं आहे. मला आठवतं, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सप्ट उल्लेख केला होता की गृहखाते अनिल देशमुख चालवतात आहेत की अनिल परब चालवता आहेत?, त्यावर काल शिक्कामोर्तब झालेलं आहे,’ असे आमदार राणे यांनी म्हटले आहे. (resign rather than swear bjp mla appeals to transport minister )

माझा मुद्दा एवढाच आहे की वकील असणाऱ्या माणसांनी अश्या प्रकारच्या शपथा घ्यायचा असतात काय?, असा सवाल करतानाच तुमच्यात हिम्मत असेल तर मुळातच तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे आणि चोकशीच्या समोर जायला पाहिजे, असे आवाहनही राणे यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
जो नियम अनिल देशमुख यांना लागतो, सिंचन घोटाळ्याच्या वेळी जो नियम अजित पवार यांना लागतो, जो नियम आदर्श घोटाळ्यांच्या वेळी अशोक चव्हाण यांना लागू होतो तोच नियम अनिल परबाना लागू होतो. तेव्हा अनिल देशमुख, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी शपथा खाल्या नाहीत, तर ते चोकशीला समोरे गेले, असे राणे पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

चौकशीला जाण्यापेक्षा राजीनामा द्या- राणे

नितेश राणे पुढे म्हणाले की, आता अनिल परब यांनी लहान शेंबड्या मुलासारख्या शपथा खाण्यापेक्षा, त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. कारण चौकशीला जात असताना तुम्ही मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊ शकता. म्हणून प्रथम राजीनामा द्या, नंतर चौकशीला समोरे जा आणि मग सर्व सत्य बाहेर येवू द्या. कारण सचिन वाझे व अनिल परब याच्या मधील असलेले सवांद हे एनआयएकडे आहेत. आज नाही तर उद्या सत्य बाहेरच येणार आहे. उद्या तोंड काळं होण्यापेक्षा आजच राजिनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here