मुंबई: रमझान महिन्यात धार्मिक स्थळांमध्ये मुस्लिम समाजाला सर्व करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून मशिदी किंवा धार्मिक स्थळांवर अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काही मौलवी आणि मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. (allow during the muslim clerics leaders demand)

रमझानचा पवित्र महिना पुढील आठवड्यात सुरू होत असल्याने मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंगळवारी भेट घेऊन ही मागणी केली. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिमांना रात्रीच्या वेळी खास तारावीह नमाजसह मशिदींमध्ये नमाज घालण्यास वंचित ठेवले जाऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.

रात्रीचे लॉकडाउन हे रात्री १० वाजल्यापासून लागू करण्यात यायला हवे, जेणेकरून लोक रात्रीची नमाज पढून त्यांच्या घरी परतू शकतात, अशी मागणीही मुस्लिम नेत्यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील सर्व मशिदींमध्ये जाऊन नमाज पढण्याची मुस्लिम बांधवांना देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मात्र यावेळी सर्व लोक मास्कचा वापर करतील. तसेच ते शारीरिक अंतराचेही पालन करतील शिवाय सॅनिटायझरचाही वापर करतील, असे वचन मौलवी अथर अली यांनी नेत्यांनी राजेश टोपे यांना दिले आहेत. मशिदीत जाताना त्यांचे थर्मल तापमान देखील तपासले जाईल, असेही त्यांनी सांगितले. अली यांच्या व्यतिरिक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मौलाना खालिद अश्रफ, मुंबई अमन समितीचे प्रमुख फरीद शेख आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसिम आझमी आणि रईस शेख यांचा सामावेश होता.

क्लिक करा आणि वाचा-
आपल्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आपल्याला कळवण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या शिष्टमंडळाला सांगितले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच हाजीअली आणि माहीम दर्गा येथील ट्रस्टींनी सर्व मशिदी आणि धार्मिक स्थळांवर लोकांना प्रार्थनेसाठी ५० टक्क्यांच्या क्षमतेने परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here