कोल्हापुरातील कंजारभाट समाजातील एका धुणी भांडी करत घर सांभाळणाऱ्या एका महिलेने अनिसकडे तक्रार केली. तक्रारीनंतर या समाजात जात पंचायतीच्या नावाने सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटली. पतीच्या निधनानंतर तिने मोठ्या कष्टाने दोन मुलींना वाढवले. त्यांना शिक्षण दिले. २७ नोव्हेंबर २०२० रोजी दोन्ही मुलींची एकाच मांडवात लग्नं झाली. दोन्ही मुली एकाच घरात दिल्या. बहिणी बहिणी असणाऱ्या या मुली एकमेकांच्या जाऊबाई झाल्या. बेळगाव येथे थाटामाटात लग्न झालं. पण लग्नाच्या तिसऱ्या दिवसापासूनच नववधूंचा छळ सुरू झाला.
जेवणाचे निमित्त करून दोघींना एका पाहुण्यांच्या घरी नेले. तेथे त्यांची घेतली. या चाचणीत नापास झाल्याचा आरोप करत त्या दिवसापासून छळ वाढला. ‘तु आत्महत्या कर, नाही तर माहेरी निघून जा’ म्हणून तगादा सुरू झाला. एका मुलीचा पती तर सैन्य दलात. मला तीन खून माफ आहेत, तू आत्महत्या कर नाही तर मीच तुला गोळ्या घालीन… या सैनिकाचा रोजचा दम. सासूदेखील या छळात सहभागी. पाच दिवसानंतर दोघींना माहेरी पाठवले. नंतर मात्र त्यांनी त्यांना सासरी येण्यास मज्जाव केला.
क्लिक करा आणि वाचा-
अनेकदा विनंती करूनही मुलींना सासरी पाठविण्यास विरोध झाल्यानंतर आईचा संयम सुटला. मुलींची लग्न झाली, म्हणून आनंदीत असणाऱ्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर न्याय मागण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्याचाच एक भाग म्हणून जात पंचायत बसली. सासू काही नातेवाईकांना घेऊन तेथे पोहोचली. जात पंचायतीने कौमार्य चाचणीत नापास झाल्याचा ठपका ठेवत काडीमोड घेण्याचा प्रस्ताव पुढे आणला. डमी नवरा उभा करून त्याने बाबळीची काडी मोडली. झाला घटस्फोट.
क्लिक करा आणि वाचा-
या अमानुष न्यायानंतर आई आणि दोन्ही निराधार मुलींना आकाशच कोसळल्याचा अनुभव आला. त्यांनी अनिसकडे तक्रार केली. अनिसने पुढाकार घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दोन्ही पतीसह सासूवर गुन्हा नोंद झाला आहे. आता राजारामपुरी पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र, कौमार्य चाचणी आणि जात पंचायतला कायद्याने विरोध असतानाही अजूनही ही अनिष्ट प्रथा समाजात सुरू असल्याचे समोर आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times