पाटणाः नोकऱ्यांमधील आरणक्षाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला विरोधकांनी टीकेचं लक्ष्य केलंय. आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनीही भाजपवर निशाणा साधलाय. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे जाती का संपवत नाही? असा सवाल लालूंनी केलाय. लालूंनी ट्विट करून सरकारवर टीका केलीय.

आरक्षण संपवणारे जाती का संपवत नाही? कारण जात त्यांना श्रेष्ठ बनवते. जातीमुळे मोठं स्थान मिळवून विनाकारण त्यांच्या अहंकार येतो. आधी आजार संपवा असं आम्ही म्हणतो. पण ते उपचार संपवाण्याची भाषा करतात, असं लालूंनी ट्विटमधून म्हटलंय.

विरोधकांसह सहकारी पक्षही नाराज

नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं असताना सहकारी पक्षही नाराज झालेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावरून आरएसएसला टीकेचं लक्ष्य केलं. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं लोक जनशक्ती पार्टीने म्हटलंय. सरकारने या प्रकरणी हस्तक्षेपाची मागणी केलीय. पदोन्नतीत आरणक्ष नसल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आम्ही आहोत, असं अपना दलच्या अनुप्रिया पटेल म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here