मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक याला नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले आहे. एनसीबीने मागील दोन दिवसांपासून डॉन चिंकू पठान याचा भाग असलेल्या डोंगरी भागात अमली पदार्थ दलालांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली आहे. त्याच कारवाईत दानिश चिकना हा एनसीबीच्या जाळ्यात आला आहे. दानिश चिकना हा नावाने देखील हे कृत्य करीत होता. या प्रकरणात चिंकू पठानला दोन महिनेआधीच अटक झाली आहे. (mumbai arrested dawood ibrahim aide danish chikna alias danish merchant)

दानिश चिकना याला पकडण्यासाठी मुंबई एनसीबी आणि राजस्थान पोलिसांनी एक संयुक्त अभियान राबवले होते. मुंबई एनसीबीच्या माहितीवरून कोटा येथे २ एप्रिलला दानिशला अटक करण्यात आली. मुंबईतील डोंगरी भागात राहणारा दानिश हा मुंबईत ड्रग्जचा कारखाना चालवतो. दानिश चिकना मुंबई एनसीबीला दोन प्रकरणांमध्ये हवा होता. या व्यतिरिक्त डोंगरी पोलिस ठाण्यात त्याच्यावर ६ गुन्ह्यांची नोंद आहे.

क्लिक करा आणि वाचा-
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत टाकलेल्या एका छापेमारीदरम्यान एनसीबीने दाऊदचा हस्तक चिंकू पठाण याला अटक केली होती. चिंकू पठाणची चौकशी सुरू असताना त्यात दानिश चिकना याचे नाव आले होते. एनसीबीच्या पथकाने यापूर्वी दानिशला पकडण्यासाठी दानिशच्या कारखान्यात धडक दिली होती. मात्र, त्यावेळी भितीवरून उडी मारून तो पळून गेला होता.

क्लिक करा आणि वाचा-
त्यानंतर दानिश हा राजस्थानात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. एनबीच्या पथकाने अजमेरमध्ये दानिशला घेरले असता तो गुंगारा देत फरार झाला होता. मात्र त्यानंतर तो कोटामध्ये असल्याचे समजल्यानंतर एनसीबीने ही माहिती राजस्थान पोलिसांना दिली. त्यानंतर दानिशला अटक करण्यात आली. पूर्वी दाऊद राहत असे त्या डोंगरी भागातच दानिश राहतो. आजही दाऊदच्या अनेक मालमत्ता डोंगरी भागात आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here