वाचा:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर २०२० नंतर सहा महिन्यांनी एप्रिलमध्ये पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्या शंभर पार गेली आहे. त्यावर बोट ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक बाबी स्पष्ट केल्या. जिल्ह्यात कडक नियमांचे पालन पोलीस व प्रशासनाने करावे असे निर्देश त्यांनी दिले असून सध्या कोविड लसचा साठा संपल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचा:
राज्य शासनाने विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करून त्यातील तरतुदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने करोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. सरकारच्या आदेशामध्ये जिल्ह्यातील परिस्थितीनुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढणेबाबत सर्वाधिकार दिले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोना संसर्ग कमी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत, असे के. मंजुलक्ष्मी यांनी नमूद केले.
वाचा:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद करण्यात यावेत. आठवड्याच्या सातही दिवशी विवाह समारंभास परवानगी देणेबाबत संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्याची कोविड १९ संदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा. कंटेन्मेंट झोन व हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणी परवानगी देताना जे नियम आहेत त्यांची अंमलबजावणी करावी. लग्न समारंभामध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. लग्न समारभांमध्ये येणाऱ्या वऱ्हाडींना सेवा देणाऱ्या सर्व कामगार वर्गाचे लसीकरण करणे बंधनकारक असेल आणि जोपर्यत लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असणं बंधनकारक असेल. तसे नसल्यास संबंधितास १ हजार रुपये दंड आकारावा व आस्थापना मालकास १० हजार रुपये दंड आकारावा, असे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times