मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी परिवहन मंत्री यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी अटकेत असलेले यांची एनआयए कोठडीत भेट घेतल्याचा आरोप परब यांनी केला होता. मी वाझेंना कोठडीत भेटलो हा दावा हास्यास्पद असल्याचे सांगून त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय पुढील १५ दिवसांत आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल असेही पाटील यांनी म्हटले आहे. ( has claimed that 2 or 3 ministers will have to resign in the next 15 days)

चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणाचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करा अशी मागणी केली आणि ती लावून धरली. मग त्यानंतर वाझे यांना मोठ्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर मग त्यांना पदावरुन दूर करण्यात आले. या एकाच मुद्द्यावरून विधानसभा नऊ वेळा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढे ते प्रेम वाझेंवर. एक मिनिट विधानसभेचा जाणं म्हणजे काही लाखो, करोडो रुपयांचे नुकसान असते. सभागृह पूर्ण दिवस चाललेच नाही.

क्लिक करा आणि वाचा-
मात्र, दुसऱ्याच दिवशी वाझेंबाबत गृहमंत्र्यांनी घोषणा केली नाही, तर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी घोषणा केली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. अनिल परब विचारतात की या प्रकरणात एका मंत्र्याचे नाव येणार हे तुम्हाला कसे कळाले?, मात्र याची सरुवात तेथेच आहे. सभागृह नऊ वेळा स्थगित झालेले असताना तुम्ही काही केले नाही इतके तुम्हाला वाझे प्रिय आहेत, असे पाटील यांनी म्हटले आहे. वाझे हे महावसुली आघाडीचे किती प्रिय…. असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

वाझेंची भेट झाली म्हणे, म्हणजे त्या वाझेंवर तुमचा किती विश्वास. आता एनआयएच्या कोठडीत मी कुठे जाणार?, मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. गिरण भागात आमचं घर आहे. मी एनआयए कोठडीत जाऊन सचिन वाझे यांची भेट घेतली आणि त्याना अनिल परब, तसेच शरद पवार यांचे नाव लिहा असे सांगितले हे हास्यास्पद आहे, असेही चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

‘दोन-तीन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे लागतील’

महाविकास आघाडी सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडताना पाटील पुढे म्हणाले की, पुढील १५ दिवसांत सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची वेळ येईल असा दावा त्यांनी केला आहे. येत्या १५ दिवसांत आणखी दोन-तीन मंत्री राजीनामे देतील. आता त्यांची नावे मला विचारु नका. कोणीतरी कोर्टात जाईल आणि त्यानंतर अनिल परब यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असं ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here