३७ डॉक्टर करोना पॉझिटिव्ह
देशात करोना व्हायरसची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेत आता ३७ डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीतील खासगी सर गंगाराम हॉस्पिटलमधील हे डॉक्टर आहेत. हॉस्पिटलमधील करोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या ३७ डॉक्टरांना संसर्ग झाला आहे. यातील बहुतेक डॉक्टरांमध्ये करोनाची प्राथमिक लक्षणे आहेत. एकूण ३२ डॉक्टर आयसोलेशनमध्ये आहे. इतर ५ डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, हॉस्पिटलमधील सूत्रांनी ही माहिती दिली.
दिल्लीत पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वाढत आहे. दिल्ली आरोग्य विभागाने गुरुवारी आकडेवारी जारी केली. यानुसार गेल्या २४ तासांत ७४३७ करोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. ३६८७ जण करोनातून मुक्त झाले आहेत. दिल्लीतील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २३ हजारांवर गेली आहे. दिल्लीत सध्या २३१८१ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times