रायपूरः केंद्रीय गृहमंत्री ( ) यांनी सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंह मनहास यांच्याशी ( cobra jawan ) बातचीत केली. राकेश्वर हे ६ दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांची नक्षलवाद्यांनी सुटका केली. यानंतर अमित शहा यांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अमित शहा यांनी सुटका झालेल्या जवानाशी फोनवरून बातचीत केली, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली. राकेश्वर सिंह हे सीआरपीएफच्या २१० व्या कोब्रा बटालियनमध्ये आहेत. नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील तर्रेम येथे जवानांवर हल्ला केला होता. यात २३ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर राकेश्वर सिंह हे नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते.

सरकारने बनवलेल्या मध्यस्थांच्या एका टीमने नक्षलवाद्यांशी केलेल्या चर्चेनंतर राकेश्वर यांची सुटका करण्यात आली. त्यांची सुटका झाल्याने छत्तीसगडपासून ते जम्मूपर्यंत आनंदाचं वातावरण आहे. राकेश्वर यांच्या पत्नीने आनंद व्यक्त केला आहे. आजचा आपल्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, असं त्या म्हणाल्या.

हा आपल्या रणनीतीचा विजय

दरम्यान, राकेश्वर सिंह यांच्या सुटकेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा आपल्या रणनीतीचा विजय आहे. ज्या अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ती यशस्वीपणे पूर्ण केली. राकेश्वर सिंह सुरक्षित परतले. त्यांचे कुटुंबीयही चिंतेत होते, अस मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here