नमुन्यांची अद्याप तपासणी नाही
आम्ही प्रचंड घाबरलोय. लवकरात लवकर आम्हाला मदत करा. या जहाजावर सध्या ३२०० नागरिक आहेत. या पैकी फक्त ५०० जणांचे वैद्यकीय नमुने तपासले गेलेत. आमच्यापैकी कुणाचेही नमुने घेण्यात आलेले नाहीत, असं या व्हिडिओत क्रू मेंबर्सनी म्हटलंय. क्रूझवर असलेल्या इतर लोकांपासून आम्हाला वेगळं करा आणि लवकरात लवकर आमच्या घरी पोहोचवा, अशी त्यांची मागणी आहे.
क्रूझवर १६२ क्रू मेंबर आहेत. काही भारतीय प्रवासी पण आहेत. क्रूझवरील ९० टक्के लोक करोनाच्या लागणपासून दूर आहेत. यामुळे पंतप्रधान मोदींना आमची विनंती आहे, आम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. जपान सरकारकडून अद्याप मदत मिळालेली नाही. यामुळे भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रांनी मदतीसाठी पुढे यावं. करोनाची लागण झाली तर मदतीचा काहीच उपयोग होणार नाही, असं विनय कुमारने म्हटलंय.
योकोहामाहून निघालेल्या या जहातून २५ जानेवारीला एक प्रवासी हाँगकाँगमध्ये उतरला होता. या प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तर क्रूझवरील जवळपास १३० प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचं स्थानिक माध्यमांचं म्हणणं आहे. यात आणखी ६६ जणांना करोनाची लागण झाल्याचं म्हटलं जातंय.
भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूः परराष्ट्र मंत्री
क्रूझवर अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय दुतावासाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असं ट्विट पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केलंय. क्रूझवर असलेल्या कुठल्याही भारतीयाला करोनाची लागण झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. २१ जपानी, ५ ऑस्ट्रेलियन आणि कॅनडाच्या ५ नागरिकांना करोनाची लागण झाल्याची माहिती क्रूझच्या व्यवस्थापनाने रविवारी दिली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times