करोनावरील लसीचा डोस घेतल्यानंतरही आपल्याला हलगर्जीपणा करून चालणार नाही. मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व काळजी घेणं आवश्यकच आहे. शहरांमध्ये मोठ्या संख्येत गरीब राहतात. झोपडपट्ट्यांमध्ये हे गरीब राहतात. तरुण आणि व्हॉलिंटियर्सनी या नागरिकांच्या लसीकरणासाठी पुढे आलं पाहिजे. देशातील तरुणांनी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं आवाहन मोदींनी केलं.
‘११ ते १४ एप्रिल दरम्यान लस उत्सव’
११ एप्रिलला समाज सुधारक ज्योतिबा फुले यांची जयंती ( ) आहे. तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ( ) आहे. याकाळात करोनावरील लसीचा एकही डोस हा वाया जाऊ देऊ नका. जास्तीत जास्त लसीकरण झाले पाहिजे. यामुळे देशातील वातावरण बदलण्यास मदत होईल. केंद्र सरकार या ‘लसीकरण उत्सवा’साठी आवश्यक तेवढा लसींचा पुरवठा करेल, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आपण देशात एका दिवसात ४० लाख नागरिकांना लसीचा डोस देण्याचा टप्पा ओलांडला आहे. जगातील विकसित देशांनी लसीकरणासाठी जे नियम केले आहेत, भारतातही त्या पेक्षा वेगळे नियम नाहीत. यामुळे आपल्याला प्राधान्य क्रमाने ही लसीकरण मोहीम पूर्ण करायची आहे. यात लसीचे डोस वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times