२०१५ मधील असून पवार यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींनी संगनमत करून जमिनीची कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे ठाणे महापालिकेत अर्ज करून बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप पवार यांच्यावर आहे. तसेच तीन लाख रुपये स्वीकारले. उर्वरित रकमेसाठीही त्रास दिल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. या आरोपानंतर ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावेळी पवार काँग्रेसचे नगरसेवक होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते पालिकेत भाजपचे गटनेते आहे.
या प्रकरणात अटक होऊ नये यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयात दिलासा मिळाला नाही. नंतर पुन्हा ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ठाणे न्यायालयाने नुकताच अर्ज फेटाळून लावल्याने पवार फरारी झाले होते. कासारवडवली पोलिस ठाण्याचे तसेच खंडणी विरोधी पथकाकडूनही पवार यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र ते काही सापडले नाहीत. अखेर सोमवारी त्यांनी कासारवडवली पोलिस ठाण्यात शरणागती पत्कारली. त्यानंतर पवार यांना अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times