मुंबई: कामगार चळवळीचा अंगार फुलवणाऱ्या कडव्या ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. नवलकर या डाव्या चळवळीची जडणघडण, तिचा उत्कर्ष आणि बदलातील प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या लढाऊ सैनिक होत्या. त्यांच्या जाण्याने भारतीय कम्यनिस्ट चळवळीचा एक धगधगचा अंगार विझल्याची भावना भारतीय कम्युनिस्ट कार्यकर्त्यांमध्ये आहे.
(senior communist leader at the age of 100)

काँम्रेड सुंदर नवलकर या कडव्या डाव्या नेत्या ओळखल्या जात. काॅम्रेड नवलकर या भारतीय कम्युनिस्ट क्रांतिकारक चळवळीतील एक ठळक खूण असल्याचे मानले जाते. त्यांनी आपले समर्पण, विचार आणि लढाऊ वृत्तीच्या जोरावर हजारो कामगारांचे संघटन केले होते. त्यांच्या कार्याचा प्रभाव १९७४ सालच्या ऐतिहासिक रेल्वे संपात देखील उमटला होता. तसेच दलित पँथरमध्ये देखील त्याच्या कार्याचा प्रभाव दिसून आला.

कॉम्रेड सुनील दिघे आणि लक्ष्मण पगार यांच्यासमवेत त्यांनी सी.पी.आय. (एम.एल.) ची महाराष्ट्र समिती सुरू करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्यांनी कामगार संघटनेमार्फत कामगारांवरी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. देशात १९७५ साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमध्येही त्यांनी मोठे कार्य केले.

सन १९७० च्या उत्तरार्धात त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात (मार्क्सवादी-लेनिनवादी) उजव्या किंवा नवसंशोधनवादी विचारसरणी रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. डिसेंबर १९७८ मध्ये सीपीआय (एमएल) ची मध्यवर्ती टीम तयार करणार्या प्रमुख शिल्पकार ठरल्या होत्या.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here