म. टा. प्रतिनिधी,

जळगाव जिल्हयात करोना प्रतिबंधक लसीकरणात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३३ केंद्रापैकी केवळ २३ केंद्रावर आज शुक्रवारी सुरु होते, तर उर्वरित ११० केंद्रावरील लसीकरण ठप्प झाले. दरम्यान आज शुक्रवारी दुपारपर्यंत उपलब्ध होणारे कोविशिल्ड लसीचे ३५ हजार सायंकाळपर्यंत प्राप्त झाले नसल्याची माहीती प्रशासनाकडून देण्यात आली होती. ( in district out of 133 centers only 23 centers were vaccinated)

जळगाव शहरातील सहा केंद्रांवर सरासरी १ हजाराच्या आसपास रोज लसीकरण होत होते. त्यादृष्टीने शहराला रोज किमान १२ हजार डोस इतका लसीचा साठा उपलब्घ होणे आवश्यक आहे. यात सहाही केंद्रांवर तुटवडा असून नागरिकांना परत जावे लागत आहेत. यात दुसरा डोस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. ४५ वर्षावरील सर्वच नागरिकांना लस देण्याचा चौथा टप्पा सुरू असून जिल्ह्यात ही संख्या १४ लाखांच्या आसपास आहे. जळगाव जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा साठा शून्यावर गेला आहे. तर कोव्हॅक्सिनचे ३२०० डोस उपलब्ध होते. हे डोसही एका दिवसात संपतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १७ केंद्रांवर गेल्या दोन दिवसांपासून एकही लसीकरण झालेले नाही.

क्लिक करा आणि वाचा-
लसीचे ३५ हजार डोस घेऊन गाडी निघाली असून ती शुक्रवारी दुपारपर्यंत जळगावात येणार होती. मात्र, सायंकाळपर्यंत हा साठा पोहचलेला नव्हता. साठा आज प्राप्त न झाल्यास उद्या शनिवारी जे २३ केंद्रावर लसीकरण सुरु आहे. त्यापैकी देखील काही केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६८ हजार ४४४ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर १९ हजार ३४२ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here