सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होम क्वोरंटाईन (गृह अलगिकरण) बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढत असल्याने राज्यात असा पहिलाच निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे. या निर्णयावर अंतिम शिकामोर्तब सोमवारी जिल्ह्याधिकारी घेणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री व सिंधुधुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. (it has been decided to close in district as the number of corona patients is increasing rapidly)

सिंधुदुर्गात वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना बाबत महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तसेच पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा-
आज रात्रीपासून राज्यभरात कडक विकेंड सुरू होत आहे. हा लॉकडाउन सोमवारी सकाळी ७ पर्यंत सुरू राहील. या बैठकीत सुरू होणाऱ्या विकेंड लॉकडाउनची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर जिल्हावासियांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर होम कोरोनटाईंन (गृह अलगीकरण) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर ज्या रुग्णांना करण्यात आले आहे, अशांना तालुका स्थरावरच्या कोवीड सेंटरमधे रुग्णांना दाखल केलं जाणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-
घरी आयसोलेशन करण्यात आलेल्या रुग्णांना जर कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं, तर रुग्णांचा आकडा कमी होऊ शकतो. त्यामुळे आता होम क्वोरंटाईन करण्याचा निर्णय जिल्ह्यापुरता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here