मुंबई: राज्यात आज नव्या बाधित रुग्णांचा आकड्यात कालच्या तुलनेत काहीशी वाढ झाली असून राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५८ हजार ९९३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५६ हजार २८६ इतकी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ झाली असून ही संख्या २ हजार ७०७ ने अधिक आहे, ही चिंता वाढवणारी बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४५ हजार ३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ३६ हजार १३० इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाख ३४ हजार ६०३ वर जाऊन पोहचली आहे. (maharashtra registered 58993 new cases in a day with 45391 patients recovered and 301 deaths today)

आज राज्यात एकूण ३०१ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ३७६ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज ४५ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २६ लाख ९५ हजार १४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.९६ टक्क्यांवर खाली आले आहे.

पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या लाखाच्या पुढे

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ३४ हजार ६०३ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ५१ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८८ हजार ०५३ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ६७ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६३ हजार ०३६ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ०१९ इतकी आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here