वाचा:
राज्यात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. मात्र निर्बंध लागू करून चार दिवस झाले तरी स्थितीत विशेष असा कोणताही फरक पडलेला नाही. राज्यात सातत्याने ५० हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत आहे. राज्यात आजही ५८ हजार ९९३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांचा हा आकडा झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवरही ताण वाढू लागला आहे. त्यामुळेच करोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना पाचारण केले आहे.
वाचा:
सर्वपक्षीय बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते , मनसे अध्यक्ष , भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच समाजवादी पार्टी व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत गेल्यावर्षीप्रमाणे संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सरकारच्या वतीने सांगितले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
वाचा:
या बैठकीबाबत प्रवीण दरेकर यांनीही माहिती दिली. आज एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जी बैठक झाली त्यात सर्वपक्षीय बैठक घेण्याचा विचार पुढे आला व तसा निर्णय झाला, असे दरेकर म्हणाले. लॉकडाऊनाबाबतही दरेकर यांनी भाजपची भूमिका मांडली. करोनाची स्थिती लक्षात घेऊन संपूर्ण लॉकडाऊनची गरज असेल तर तो निर्णय घेतला पाहिजे पण ते करताना हातावर पोट असलेली गोरगरीब जनता असेल वा छोटे व्यापारी आणि व्यावसायिक असतील त्यांचा सरकारने विचार केला पाहिजे. त्यांच्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज दिले गेल्यास आम्ही लॉकडाऊनच्या निर्णयात सरकारसोबत राहू असे दरेकर म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times