हेमंत नगराळे यांची नियुक्ती राज्याच्या पोलिस महासंचालकपदी झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश सेठ यांना राज्याच्या महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. आता त्या जागी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज संध्याकाळी उशिरा राज्य शासनाने हे आदेश काढले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
गेल्या महिन्यात झालेल्या बदल्यांच्या क्रमात संजय पांडे यांना राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली. याचे कारण म्हणजे पांडे यांच्या जागी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे नाराज झालेले पांडे सुट्टीवर निघून गेले होते. त्यानंतर संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. माझी ज्येष्ठता डावलून माझ्यावर अन्याय झाल्याची त्यांची तक्रार होती.
क्लिक करा आणि वाचा-
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, बदलीच्या या आदेशात, डीजी-लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पद माझ्याकडून काढून ते कनिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे. पोलिस महासंचालकानंतरचे दुसरे सर्वात वरिष्ठ पद मुंबई पोलिस आयुक्तपदाचे असल्याने तुम्ही कमीतकमी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदासाठी तरी माझ्या नावाचा विचार करायला हवा होता, असा तक्रारीचा सूर पांडे यांनी लावला होता.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times