ज्या परवानाधारकांना भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य-स्पिरिटस, बीअर, सौम्य मद्य, वाई अशा मद्यप्रकारांची विक्री करण्याचा परवाना प्राप्त आहे, केवळ त्या मद्य प्रकाराची विक्री करण्याची त्यांना परवानगी असेल. फक्त परवानाधारकाने संबंधित मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली तरच परवानाधारकास अशा मद्याचे वितरण परवानाधारक ग्राहकाच्या निवासी पत्यावर करता येईल असे महापालिकेने सुधारित परिपत्रकात केली आहे.
आठवड्यातील सर्व दिवशी परवानाधारक मद्याची विक्री आणि वितरण केवळ त्याना परवानगी असलेल्या आवारातूनच करावी लागणार आहे. तसेच मद्य वितरणाची वेळ ही सकाळी ७ ते रात्री८ याच वेळेत करता येणार आहे. या वेळेत कोणीही मद्यपानासाठी किंवा मद्य विकत घेण्यासाठी किंवा मद्याची ऑर्डर देण्यासाठी मद्याच्या दुकानांपर्यंत जाऊ नये असे महापालिकेने सूचित केले आहे.
अशा मद्याच्या विक्रीसाछी घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाईल, त्या व्यक्ती मास्कचा वापर, वेळोवेळी हातांचे निर्जंतुकीरण करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्य शासनान लागू केलेले ‘ब्रेक द चेन’ बाबतचे आदेश जोपर्यंत अस्तित्वात असतील तोपर्यंत महापालिकेचे हे आदेश लागू असतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महापालिकेने बजावले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times